पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)चंदननगर पोलिसांची मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करुन पिडीत महिलांची सुटका.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अशोकानगर येथील बिल्डींगमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती गुप्त बातमीदार कडून मिळाली असता पोलिसांनी सन शाइन स्पा, स.नं. ४३, अशोकानगर बिल्डींग, पुणे फिटनेस क्लबचे शेजारी, तिसरा मजला, खराडी बायपास चौक, खराडी ठिकाणी चंदननगर पोलिसांनी छापा टाकुन तेथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा चालक संदीप चव्हाण, रोहीत शिंदे, स्पाचा मॅनेजर गोपाळ व स्वाती उर्फ श्वेता विजय सुर्यवंशी यांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार  चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन तेथील तीन पिडीत महिलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ चे सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस हवालदार गोणे, गुरव,  घावटे, कदम, डांगे, महिला पोलीस हवालदार नागरे, देव्रकाते, वानखेडे, जाधव, हंबीर, सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *