कुंजीरवाडी-(हवेलीनामा वृत्तसेवा ) पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने स्वर्गिय शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था २०२५चा पुरस्कार हवेली तालुक्यातील उत्कृष्ट पतसंस्था म्हणून नावारूपास आलेली (कुंजीर वाडी ता हवेली) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.थेऊरफाटा या संस्थेला जाहीर करण्यात आला होता.
हा कार्यक्रम पुणे येथील रमा रामन मंगलकार्यालय येथे दि.२८ सप्टेबर रोजी
पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्यावतीने स्वर्गीय शिवाजीराव आदर्श आदर्श पतसंस्था पुरस्कार 2025
प्रदान करण्यात आले. यामध्ये
पुणे जिल्ह्यतुन प्रथम आदर्श पतसंस्था पुरस्कार 2025 श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था थेऊर फाटा यांना पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षा व माजी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला
पतसंस्था स्थापनेपासून सभासदभिमुख कारभार करणाऱ्या श्रीनाथ पतसंस्थेचा अल्पावधीतच संपूर्ण तालुक्यात बँकिंगची सोय करून आपला नावलौकिक मिळविला आहे. संस्थेचा संपूर्ण कारभार हा संगणीकृत असून सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला जातो. प्रभावित कर्ज वसुली यंत्रणा राबवून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. सामाजिक कार्य व व्यावसायिक भागीदारी संकल्पना,विनम्र व तत्पर सेवा. पतसंस्थेस सतत “अ” वर्ग प्राप्त असून संस्था सातत्याने नफ्यात असल्यामुळे सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप व्यवसाय वृद्धी, सी.डी रेशो, कर्ज वसुली यांचे आदर्श प्रमाण संस्थेने राखले आहे. संस्थेची व्यवसायातील वाढ, ग्राहक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संचालक मंडळ, कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे उत्कृष्ट सहकार्याने हे साध्य झाले आहे. आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी संचालक व कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याचे श्रेय सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक,ग्राहक, संचालक मंडळ कर्मचारी व पिग्मी एजंटाना जाते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, अप्पा दंडवते,मांगले, संचालिका वंदना काळभोर व सर्व फेडरेशन संचालक मंडळ या मान्यवरासह मोठ्या प्रमाणात कृषी सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे वतीने व्हा. चेअरमन संभाजी आंबेकर, कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ,ज्येष्ठ संचालक महादेव धुमाळ, दत्तात्रय कुंजीर, पोपट चौधरी , राहुल धुमाळ, व्यवस्थापक शिवाजी जावळे आदी उपस्थित होते.
