पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) रांजणगाव MIDC पोलिसांची गांजा विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत 28किलो वजनाचा 7लाख रुपयांचा गांजा जप्त करुन एका महिलेसह दोन जणांना घेतले ताब्यात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील बाभुळसर खुर्द(ता.शिरुर) गावच्या हद्दीतील सृष्टी सोसायटी मधील रो हाऊस मध्ये दिव्या गिरे व तिचा नवरा अतुल गिरे यांनी गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आला असल्याबाबतची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळली असता मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने रांजणगाव पोलिसांच्या दोन पथकाने छापा टाकला असता दिव्या अतुल गिरे (वय 27 वर्षे, सध्या रा. सृष्टी सोसायटी, रो हाऊस कॉलनी, बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), सुरज दिलीप शिंदे (वय 28 वर्षे, मुळ रा. देवदैठन, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या घरामध्ये 7 लाख रुपये किंमतीचा 28 किलो वजनाचा विक्रीसाठी आणलेला गांजा हा अंमली पदार्थ घरामध्ये सापडला याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला 28 किलो वजनाचा गांजा हा फरार आरोपी अतुल वसंत गिरे यास गुन्हयामध्ये अटक केल्यानंतर त्याने गांजा हा कोणाकडुन विक्रीसाठी आणला आहे व कोणाला विक्री करणार होता याबाबत पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर, गणेश वाघ, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर, माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, रामेश्वर आव्हाड, हेमंत इनामे यांनी केली आहे
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.
