हडपसर-(हवेलीनामा वृत्तसेवा) हडपसर पोलिसांनी २०लाखाचे चोरीस गेलेले दागिने फिर्यादींना परत केले हा कार्यक्रम
२६ सप्टेंबर रोजी पुणे परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, यांच्या उपस्थितीत फिर्यादींना हस्तांतरण करण्यात आले. ते हडपसर पोलीस स्टेशनचे सन २०२५ चे. वार्षिक निरीक्षण करण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा दरबार घेतला, तसेच पोलीसांच्या कामगिरीचा आढावा घेत असताना, नागरिकांसाठी खास जप्त मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमात हडपसर पोलीसांकडून घरफोडी, चैन चोरी, तसेच पालखी दरम्यान जप्त केलेल्या किमती मुद्देमालाचा समावेश होता. वेगवेगळ्या ७ गुन्ह्यांमधून जप्त केलेला मुद्देमाल, संबधित फिर्यादींना डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
१७६.१२० ग्रॅम वजनाचे २०,१०,०००/ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आले चोरीस गेलेले दागिने पुन्हा फिर्यादींच्या हातात आल्याने फिर्यादींच्या चेह-यावर आनंदाचे आश्रू उमटले

कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी हडपसर पोलीसांचे विशेष कौतुक केले. गुन्ह्यातील जप्त माल परत देण्याची ही कृती केवळ कायद्याची अंमलबजावणीच नाही तर नागरिकांचा विश्वास दृढ करणारी असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील नात अधिक घट्ट झाले असून, गुन्हेगारांविरूध्द कठोर भूमिका घेत असतानाच प्रामाणिकपणे मेहनत करून नागरिकांना न्याय मिळवून देणे हेच पोलीसांचे खरे काम असल्याचे या सोहळ्याने दाखवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *