पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)   राज्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुले करण्यात आली मागील दीड वर्षापासून देशात कोरानाचे संकट आहे मंदिर खुली करताना या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी विशिष्ट नियमावली केली आहे. त्याचे पालन करत वडजाई दत्तविहार येथील श्री तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून देवीची विधीवत पूजा करत नवरात्र उत्सवास सुरुवात केली आहे.
   वाघोली पंचक्रोशीत नवरात्र उत्सवास प्रसिद्ध असलेले दुर्गा माता प्रतिष्ठान यंदाच्यावर्षी नवरात्र उत्सव कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा करणार आहे. कोरोनाच्या आधी दोन वर्षापूर्वी दुर्गा माता प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करीत असे. दुर्गा माता प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक,धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जात यामध्ये ऑर्केस्ट्रा, संगीत खुर्ची, महिलांसाठी दांडिया, महाप्रसाद, कोजागरी पौर्णिमेला देवीची मिरवणूक असे विविध कार्यक्रम लोकवर्गणीतून होत असत. परंतु यावर्षी कोरोणामुळे कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. असे दुर्गा माता प्रतिष्ठानच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे
  1.           देणगीचा उपयोग सामाजिक उपक्रमासाठी करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप सातव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *