पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली येथील श्री अष्टविनायकापैकी एक असलेल्या चिंतामणी गणपतीची पहाटे पाच वाजता अजय आगलावे यांनी महापुजा करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आज घटस्थापनेच्या दिवस असल्याने केवळ गावातील भाविक दर्शनासाठी येत असल्याचे दिसून आले फार तुरळक भाविक बाहेर गावाहून येत होते.
मंदिरे खुली करताना शासनाने काही नियम घालून दिले आहेत त्याकडे थोडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवले तोंडावर मुखपट्टी आवश्यक असताना अनेकजण मोकळ्या तोंडाने वावरत होते गर्दी नसल्याने सामाजिक अंतर राखले जात होते दर्शनबारी साठी चौकोन आखले असले तरीही त्याचा विशेष फायदा झाला नाही तर लहान मुले व वयोवृद्ध यांना प्रवेश बंदी असताना अनेकजण बिनधास्त मंदिरात लहान मुलांना आणत होते सुरक्षारक्षक कोणाकोणाला अडवणार हा प्रश्न होता.
आज मंदिर उघडण्यापूर्वी सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच स्वच्छता राखण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.सकाळपासून चिंचवड देवस्थानचे व्यवस्थपक डॉ मंगलमूर्ती पोफळे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
गेली जवळपास नऊ महिने मंदिर बंद असल्याने येथिल व्यापारावर मोठा विपरित परिणाम झाला होता मंदिर उघडल्याने लवकरच बाजारपेठा गजबजून जातील अशी छोट्या व्यापाऱ्यांना आस लागली आहे.

