पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) पुण्यात एका उच्चशिक्षित बँक कर्मचारी निकाल मटका बुकी दिवसा बँकेत नोकरी  रात्री ऑनलाईन मटका घेण्याचे काम करत होता. खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला असून बँक कर्मचाऱ्यासह  17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहूल दिलिपसिंग परदेशी(42, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, बेनकर वस्ती, धायरी गाव) याला अटक केली आहे. त्याच्यासोबत ऑनलाईन मटका खेळणाऱ्या आणखी 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल परदेशी  पदवीधर असून सध्या तो बँकेत नोकरी करतो. दिवसा बँकेतील कामकाज सांभाळून रात्री ऑनलाईन मटक्याचे आकडे घेत होता निळू फुले जलतरण तलावाजवळ एक व्यक्ती मोबाईल फोनद्वारे मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना आढळून आला. त्यावेळी राहुल परदेशी याला ताब्यात घेण्यात आले यावेळी त्याच्याकडे 562 रुपये रोख, मोबाईल फोन, असा एकूण 3562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या फोनची तपासणी केली असता सतरा जण त्यांच्या कडे फोनवर मटका खेळत असल्याचे निष्पन्न झाले
याप्रकरणी खडक पोलिसांनी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशाल शेडगे (रा. लोहियानगर), सुरज ज्ञानेश्वर गायकवाड (रा. खडकमाळ आळी), मुकेश सातपुते (रा. पानघंटी चौक), प्रतीक बनकर (रा. झगडेवाडी), विजयसिंग बाळारामसिंग परदेशी (मामा) (रा. घोरपडी पेठ), शिवा धनगर (रा. पदमावती), सुनिल वाघ (रा. सिंहगड रोड), बालाजी दत्तात्रय गट्डे (रा. सदाशिव पेठ), सचिन मधुकर सुपेकर (रा. पर्वती दर्शन), सचिन पालवे (रा. शिवतेजनगर, कोथरुड), विलास दिवाणे (रा. खडकमाळ आळी, राठी वाडा), रहीम शेख (अब्दुल रहिम हजारी शेख) (रा. एम जी रोड, कॅम्प), शुभम गोडसे, अन्ना शिंदे (रा. बिबवेवाडी), शुभम सुरेश कामदुले (रा. खडकमाळ आळी), अक्षय सुभाष तेलवडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *