पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची हवेली तील तीन महिला तलाठ्यांवर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई केली यात एका 42 वर्षाच्या पुरुषाने तक्रार दिली होती यामध्ये लोकसेवक प्रेरणा बबन पारधी, (वय 30 वर्षे, तलाठी सांगरूण, हवेली, रा. फ्लॅट न. 7s, 2/4A, जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण,)
दिपाली दिलीप पासलकर( वय 29 वर्ष तलाठी बहुली, हवेली, पुणे रा.लेन न.4, स्वामी समर्थनगर, कोंढवा, काकडेनगर)
शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (वय 40 वर्ष, तलाठी खडकवाडी कडजे, हवेली, पुणे रा.सर्व्हे न.57/1, कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, सोलापूर रोड, मांजरी बुद्रुक)
याना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
यातील तक्रारदार हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना मौजे सांगरून, बहुली,खडकवाडी आणि कुडजे ता. हवेली या गावाच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोड मध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या 7/12 तसेच 8 अ उताराचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रती हव्या होत्या. त्यासाठी ते मौजे सांगरुन ता. हवेली येथे कार्यरत असलेल्या तलाठी प्रेरणा पारधी, मौजे बहुली ता. हवेली येथील तलाठी, दिपाली पासलकर मौजे खडकवाडी, कुडजे येथील तलाठी, शारदा देवी पाटील यांना भेटले त्यावेळी तक्रारदार यांना आवश्यक असलेल्या 7/12 व 8 अ उताऱ्याच्या मौजे सांगरुन गावातील 240 प्रतीसाठी तलाठी पारधी यांनी सरकारी फी व्यतिरिक्त रू. 16,400 स्पयाची लाच मागितली बहुली गावातील 106 प्रतिसाठी संबंधित गावचे तलाठी दिपाली पासलकर या सरकारी फी व्यतिरिक्त 4,910/- रुपयाची लाच मागितली तसेच खडकवाडी व कुडजे गावातील एकूण 32 प्रतीसाठी त्या गावचे तलाठी शारदा देवी पाटील या सरकारी फी व्यतिरिक्त 1520 रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि.19/09/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या कडे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने लोकसेवक प्रेरणा पारधी यांनी तक्रारदाराकडून तक्रारीपुर्वी 4000/- रुपये स्विकारल्याचे कबुल करून आणखी 12,400/-रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच लोकसेवक दिपाली पासलकर यांनी तक्रारदाराकडे 6500/- रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम पारधी यांना देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले शारदादेवी पाटील यांनी तक्रारीपूर्वी तक्रारदाराकडून 1500/- रुपये स्वतःसाठी घेतल्याचे कबूल करून आणखी 2000/- रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पडताळणीत सापळा कारवाई दरम्यान शारदादेवी पाटील यांना तहसीलदार हवेली यांच्या कार्यालयासमोर रस्त्यावर तक्रारदाराकडून रू. 2,000/- (दोन हजार रुपये) लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले वरील तिन्ही आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलूचपतचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
