पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा व सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील धार्मिक भावना असलेला कुळधर्म कुळाचाराकपैकी एक असलेल्या शारदीय नवरात्रीला उद्या सुरुवात होत असून प्रत्येक हिंदू बांधव आपापल्यापरीने यांच्या तयारीत दंग आहे.

       गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली नवरात्र उत्सव साजरा केला गेला त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून हा सण साजरा झाला यावेळी मात्र राज्य सरकारने राज्यातील विविध धार्मिक स्थळे देवदर्शनासाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धार्मिक पर्यटनाला गती मिळणार आहे मोठी अर्थव्यवस्था बंद पडलेली होती.
थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून राज्याच्या सर्व भागातून भाविक श्री चिंतामणी दर्शनासाठी गर्दी करतात. देवस्थान भाविकांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था पार पाडेल केवळ मंदिर उघडण्याची औपचारिकता शिल्लक आहे.
         थेऊर येथील श्री महातारी आई मातेची ख्याती पंचक्रोशीतील भविकामध्ये प्रसिद्ध आहे उद्या होत असलेल्या नवरात्र उत्सवात पूर्व हवेलीतील अनेव्ही भाविक तिच्या दर्शनासाठी दररोज गर्दी करतात त्याचे नियोजन उत्सव समितीकडून योग्य प्रकारे करण्यात येते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे मर्यादा आल्या होत्या यावेळी थोडी सवलत असली तरीही धोका कायम आहे सर्व नियम पाळून सण उत्सव साजरे करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *