लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा) कोयता जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांवर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई यात एका दुचाकी कोयता असा ५५१००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळाजवळ तीन जण दुचाकी वर संशयास्पद रीत्या फिरत होते त्याच्या जवळ कोयता सारखे धारदार हत्यार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत महिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपसर एहसान अन्सारी (वय ३१ रा.इंदिरानगर कदमवाकवस्ती),नदीम महेबूब मुलाणी (वय २३रा.माळीमळा),रोहित सतिश नवगण(वय२६ रा. काळेपडळ हडपसर) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळील गाडीच्या डिकीत लोखंडी कोयता सापडला असता त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहे
ही कारवाई लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ बाबर, पोलिस उपनिरीक्षक दैठणे, पोलिस शिपाई सूरज कुंभार, वणवे,भोसले यांनी केली
