लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांची अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई मुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले असून गावठी हातभट्टी दारु, गांजा विक्री, मटका पत्ते खेळणाऱ्यांवर व दारू गांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली असून तीन चार दिवसांपासून लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अवैधरित्या धंदे करणाऱ्यांची पळता भुई थोडी केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशन हद्दीतील लोणी काळभोर, कुंजीर वाडी येथील हातभट्टी गावठी दारू विक्री करणाऱ्या लोणी काळभोर येथील द्रौपदी राजेंद्र उपाध्ये (वय ३५रा.गारुडीवस्ती लोणी काळभोर),अलका भगवान आरसे(वय५५रा.खलसेवस्ती कुंजीर वाडी), कौशल्या कैलास राखपसरे (वय६० रा.लोणी काळभोर),निशा कृष्णा उपाध्ये (वर ३२रा.लोणीकाळभोर)मंगल संतोष भाले, आकाश संतोष भाले (रा.लोणीकाळभोर),लता दादा खलसे (वय४०कदमवाकवस्ती) यांच्यावर कारवाई करत जवळपास १५०लीटर गावठी हातभट्टी दारु व ११० ग्रॅम गांजा जप्त करुन कारवाई केली.  तर अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या माळीमळा  येथील तीन जणांना कारवाई केली यात शब्बीर हाजीमिया शेख (वय ३९ रा.इंदिरानगर लोणी काळभोर),मंगेश कुंडलिक गायकवाड (वय२९रा.माळी मळा), मंगेश रमेश खारपडे(वर ३९माळीमळा) यांना जुगार खेळताना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील जुगाराचे साहित्य असा व रोख रक्कम ५१५५रुपयांचा मुद्दे माल जप्त केला.
लोणी काळभोर पाषणकरबाग येथे चिकन दुकानाच्या पाठीमागे मटका  जुगार खेळताना सहा जणांना ताब्यात घेतले यात
१) दिपक रामचंद्र शेलार (वय ५२ वर्षे, धंदा मजुरी रा. बौध्दवस्ती, मराठी शाळेजवळ, लोणी काळभोर), २) सुरेश बाबुराव सावलकर (वय ७७ वर्षे धंदा मजुरी रा. लोणी काळभोर, पांढरी मळा) ३) चैतन्य राजेंद्र सोनवणे (वय ३० वर्षे धंदा मजुरी रा.
बौध्दवस्ती लोणी काळभोर)  ४) शिवकुमार रामधिरज परदेशी (वय ५५ वर्षे धंदा हातगाडी व्यवसाय रा. खोकलाईमाता मंदिर, लोणी काळभोर), ५) आण्णा कान्हु चव्हाण (वय ६२ वर्षे धंदा मजुरी रा. लोणी काळभोर), चणप्पा माधप्पा शिवमुर्ती वय (६५ वर्षे धंदा शेती रा. लोणी काळभोर) यांच्यावर कारवाई करीत ८८९०रुपये रोख व  जुगाराचे साहित्य २००रुपये असा  ९०९०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, युनिट सहाचे पोलिस निरीक्षक शाहिद पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार प्रशांत नरसाळे,राहूल कर्डिले,सूरज कुंभार, सचिन सोनवणे,वनिता यादव,प्रविण दडस,यूनिट सहाचे शेखर बाळासाहेब काटे,रुपाली कदम,निकिता पोळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *