पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) काळेपडळ पोलिसांकडून सराईत चोरटा ताब्यात बांधकाम साईडवरुन सेंट्रिंग करीता लागणाऱ्या अॅल्युमिनिअमच्या प्लेटा चोरणा-या चोरट्यास घेतले मुद्देमालासह ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्युमिनियमच्या प्लेटा चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळी जाऊन तपास पथकाने पाहणी करुन तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व गोपनिय बातमीदारांकडून दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून संशयित इसम लहु चंद्रकांत लोणार( रा. गोयलगंगा सोसायटी, महंदवाडी) यास ताब्यात घेऊन अॅल्युमिनिमच्या प्लेटांबाबत विचारले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देवू लागला. तसेच सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसणारा इसम व ताब्यात घेतलेल्या इसमाचे हालचाली वरून खात्री पटल्याने काळेपडळ पोलीस स्टेशन आणून अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडुन एकुण ६१ अॅल्युमिनीअम सेट्रींगच्या प्लेटा व टॅम्पो गाडी असा एकुण २,५३,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पुर्व मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *