लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ कडून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई  करत नऊ जणांना दोन वर्षे करीता तडीपारीची कारवाई.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
पोलिस उप आयुक्त  परिमंडळ ५ हद्दीतील लोणी काळभोर, फुरसुंगी,मुंढवा,कोंढवा  पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर  महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ प्रमाणे एका टोळीतील ०४ गुन्हेगार व कलम ५६ प्रमाणे ०५ गुन्हेगार असे एकुण ०९ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षेकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.
प्रेमलता मुकेश करमावत, वय ४५ वर्षे, रा. मंतरवाडी, गणेशनगर, फुरसुंगी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे ०६ गुन्हे दाखल आहेत.)
फुरसुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील
पंकज मुकेश करमावत, वय २५ वर्षे( रा. उत्तमनगर व शहनाई साडी सेंटरमागे, पुणे सासवड रोड, मंतरवाडी, फुरसुंगी)  बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्रीचे चार गुन्हे दाखल आहेत.मुंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील मनोज रतन गुमाणे, वय ५० वर्षे( रा. भिमनगर, साज कंपनी समोर, मुंढवा) (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्रीचे चार गुन्हे दाखल आहेत.तर शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद, वय १९ वर्षे (रा. आदर्श चाळ, राजीव गांधीनगर, रामराज्य शाळेशेजारी, सुखसागर नगर, अप्पर बिबवेवाडी)याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.लोणीकाळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील सागर संदिप गुडेकर, वय २४ वर्षे (रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याच्यावर जबरी चोरी करणे, बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे, जिवे ठार मारणे, बेकायदेशी हत्यार जवळ बाळगणे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत.
१) जाफर शाजमान इराणी, वय ४३ वर्षे, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे (टोळी प्रमुख) २) मजलूम हाजी सय्यद, वय ४८ वर्षे, रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाक वस्ती, पुणे (टोळी सदस्य)
३) शब्बीर जावेद जाफरी, वय ३८ वर्षे( रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती)  (टोळी सदस्य) ४) शाजमान हाजी इराणी, वय ६२ वर्षे( रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती) (टोळी सदस्य) यांच्यावर   फसवणुक करणे, चोरी करणे, दुखापत करणे, मारहाण करुन धमकावणे, जबरी चोरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे असे बारा गुन्हे दाखल आहेत
 जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पर्यंत २० सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच ११ मोका कारवाईमध्ये ७६ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आजपर्यंत ४१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण १३७सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती देण्याचे आवाहन परिमंडळ ५चे पोलिस उपआयुक्त  राजकुमार शिंदे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *