रांजणगाव -(हवेलीनामा वृत्तसेवा)रांजणगाव औद्योगिक वसाहतीतून तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या परप्रांतीय दांपत्याला रांजणगाव पोलिसांनी लुधीयाना पंजाब मधुन ताब्यात घेऊन तीन वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार कामानिमित्ताने वास्तव्यास आहेत. कारेगाव येथे कामानिमित्ताने काजल महेंद्र पडघाण मुळ (रा. जुमडा, ता.जि.वाशिम) या त्यांचा भाऊ प्रमोद पाटील व मुलगा कु. आयुष वय 3 वर्षे याच्यासह राहण्यास होते. त्याच बिल्डींगमध्ये परप्रांतीय दांपत्य पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव व तिचे पती अर्जुनकुमार यादव (मुळ रा. लोआलगान, चौसा, बिहार) हे भाड्याने राहण्यास होते. काजल व त्यांचा भाऊ कंपनीमध्ये कामाला जात असल्याने आयुषला संभाळण्यासाठी शेजारी राहणा-या पुजादेवी यादव यांच्याकडे ठेवून जात होत्या. १२सप्टेबर रोजी संध्याकाळी कामावरुन दोघे बहिण भाऊ आल्यावर त्यांना परप्रांतीय दांपत्याच्या घराला कुलूप दिसले यावेळी कुलूप पाहून फोन केला असता फोन बंद लागत होता त्यानंतर त्यांनी शेजारील लोकांच्या मदतीने त्यांचा मुलगा कु. आयुष, पुजादेवी यादव व तिचे पतीचा शोध घेतला पंरतु ते मिळुन आले नाही. तसेच ते मुलाला घेवुन परत येतील असे वाटल्याने त्यांची दोन दिवस वाट पाहिली. परंतु ते परत न आल्यामुळे काजल यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला अपहरणाची फिर्याद दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यानी तपासाची चक्रे फिरवून गोपनिय माहितीच्या व बिहार येथील स्थानिक पोलीसंच्या मदतीने माहिती घेतली असता आरोपी बिहार येथे आले नसल्याचे सामजले.गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुजादेवी यादव व तिचा पती अर्जुन यादव हे पंजाब राज्यातील लुधीयाना येथे पोहचल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहा. फौज. दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ पंजाब येथे दाखल झाले लुधियानातील स्थानिक पोलीसांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपी परप्रांतीय दांपत्याला ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या आयुषची सुखरूप सुटका करुन आयुष्या आईच्या ताब्यात दिले पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करीत आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, विजय सरजिने, सायबर पोलीस स्टेशनचे पो. कॉ. संकेत जाधव, पंजाब लुधीयाना येथील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल (काऊंटर एंटेलिजेन्स), गुरमित सिंग (देरसी पोलीस स्टेशन) व त्यांचे पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.
