थेऊर: प्रतिनिधी श्रीक्षेत्र थेऊर(ता.हवेली) येथे दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला
छत्रपती सेवा संघ थेऊर आयोजित दहीहंडी ग्रामपंचायत समोर साजरी करण्यात आली यावेळी गावातील तरुणासह महिलावर्ग जेष्ठ नागरिक दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण खुशी शिंदे यांचा गाण्यांचा  कार्यक्रम आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
या दहीहंडीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस थेऊर चे ग्रामपंचायत सदस्य संजय काकडे यांनी ठेवले होते. छत्रपती सेवा संघ आयोजित दहीहंडीला प्रथम सलामी दिली व नंतर दुसऱ्या प्रयत्नात महिला गोविंदा पथकाने यशस्वीरीत्या हंडी फोडली.ही
दहीहंडी पुण्यातील कसबा पेठ येथील श्री गणेश मित्र मंडळ या महिला गोविंद पथकाने फोडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.दहिहंडी फेकल्यावर उपस्थित नागरिकांनी मोठा जल्लोष केला. महिला गोविंदा पथकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
यावेळी थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष काकडे,संजय काकडे,सुजित काळे, योगेश काकडे, प्रमुख उपस्थिती संकेतभाऊ दळवी, हवेली आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे,आनंद वैराट, गणेश गावडे, युवराज काकडे,नवनाथ कुंजीर, प्रमोद राजगुरू, होते  छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू,ऋषी बिनावत,यशवंत बोराळे, निखिल काकडे,विशाल घाडगे, सुमित विलास कुंजीर, विलास सोनवणे,सुमित कुंजीर,संतोष खारतोडे, अविनाश भोसले,विजय पवार,मयुर कुंजीर, सचिन राऊत राजू तांबे, लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, चंद्रकांत माने, प्रशांत सुतार,अमोल जाधव व स्टाफ पोलिस पाटील रेश्मा कांबळे व गावातील ग्रामस्थ महिलावर्ग तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *