थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अष्टविनायकपैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती द्वार यात्रेस आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस सुरुवात झाली यात ग्रामस्थांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
महान साधू मोरया गोसावी यांच्या गणपत्य संप्रदाया प्रमाणे भाद्रपद गणपती आगमनापूर्वी द्वारयात्रेचे अनन्यसाधारण महत्व आहे. मोरया गोसावी यांचे वंशज पिरंगुटकर देव मंडळी येथे द्वार यात्रेचे आयोजन करतात. गेली अनेक वर्षांपासून ची ही परंपरा असून यामध्ये अनेक भाविक सहभागी होतात.
ही द्वारयात्रा चार दिवस चालते. पहिल्या दिवसी पूर्व दिशेस असलेल्या आसाराई देवीच्या दर्शनासाठी कोरेगाव मूळ येथे जाते. तेथील देवीची विधिवत पूजा करून महासाधू मोरया गोसावी रचित पदे गायीली जातात. त्यानंतर सर्व द्वारकारी पुन्हा श्री चिंतामणी गणपती मंदिरात सायंकाळी पोहोचते.
यावेळी देव मंडळीसह थेऊर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
