पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता ट्रस्ट यांच्या वतीने २०२४आदर्श गणेशोत्सव स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ पोलिस मुख्यालय शिवाजी नगर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
पुणे पोलिस व विघ्नहर्ता न्यास आयोजित स्पर्धेत पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५मध्ये सर्वोत्कृष्ट ६ गणेश मंडळ निवडण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक मार्केट यार्ड पोलिस स्टेशन हद्दीतील श्री छत्रपती
 शिवाजी महाराज मार्केट गणेश मंडळ यांना फुलांची सजावट यासाठी  मिळाला.
द्वितीय क्रमांक हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील नवरत्न मित्र मंडळ यांना हर घर दर्गा देखाव्यासाठी मिळाला तृतीय क्रमांक कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील धर्मवीर छत्रपती शंभूराजे मित्र मंडळ यांना फुलांची सजावट यासाठी मिळाला तर उत्तेजनार्थ मुंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील अखिल गणेशबाग मित्र मंडळ यांना ताजमहल देखाव्यासाठी मिळाला  उत्तेजनार्थ बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर मित्र मंडळ यांना शंकर महाराज  जन्म व मठ या देखाव्यासाठी मिळाला. उत्तेजनार्थ लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील जी एम फाऊंडेशन मंडळ यांना चंद्रयान  या देखाव्यासाठी मिळाला.
, या स्पर्धेत पुणे शहरातील जी धर्मादाय आयुक्त नोंदणीकृत मंडळे आहेत अशाच मंडळाना या स्पर्धेत सहभाग घेता येतो यामध्ये  विघ्नहर्ता न्यासाचे परीक्षक पथक परीक्षण करण्यासाठी मंडळांना भेट देऊन पाहणी करतात ही स्पर्धा शंभर गुणांची असते यामध्ये श्री ची मूर्ती, सीसीटीव्ही मंडळांनी राबवलेले सामाजिक उपक्रम तसेच आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट विविध प्रकारचे देखावे, विसर्जन मिरवणूकीचे नियोजन पारंपरिक वाद्यांचा वापर यासाठी गुण दिले जातात.या स्पर्धेत
  हवेली तालुक्यातील लोणी काळभोर मधील जी. एम. फाउंडेशन मंडळ माळी मळा यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले असून त्यांना “आदर्श गणेशोत्सव” पुरस्काराने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, या वेळी जी. एम फाउंडेशन मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह आयुक्त रंजन कुमार शर्मा,पोलिस उपायुक्त परिमंडळ १ कृषिकेश रावले,पोलिस उपायुक्त वाहतूक चे हिम्मत जाधव, विघ्नहर्ता न्यासाचे सर्व पदाधिकारी सर्व परिमंडळातील परीक्षक तसेच  मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *