पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलपुर महामार्गवरील सोरतापवाडी येथील अल्फा पेट्रोल पंपासमोर अचानक समोर आलेल्या जनावराला वाचविताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेला जाणाऱ्या ट्रकवर जोरात धडकली यात पीएसआय महेश अंबादास गलगटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबडतोब खाजगी रुग्णालयात हालवले.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात गंभीर जखमी झालेले महेश अंबादास गलगटे हे बार्शी शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून ते आपल्या इनोव्हा एमएच २४ वी ९५४० या चारचाकी वाहनाने बार्शी कडे निघाले होते. सोडतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोरून जात असताना अचानक गाडी समोर जनावर आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गलगटे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेला जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघातात महेश गलगटे यांच्या गाडीचा चुराडा झाला. यात पोलिस उपनिरीक्षक महेश गलगटे हे सुदैवाने बचावले, ट्रक चालकही थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, रमेश भोसले, सोमनाथ सुपेकर, उद्धव गायकवाड घटनास्थळी धाव घेऊन जखमींनाखाजगी रुग्णालयात दाखल केले व अपघातग्रस्त ट्रक व चारचाकी गाडी क्रेनच्या सहाय्याने महामार्गामधून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *