पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) पोलिस उप आयुक्त, परिमंडळ पाचच्या हद्दीतील एकूण १० सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालण्यासाठी परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील १० सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करुन धमकावणे, गंभीर दुखापती करणे, बेकायदेशीर जमाव जमावणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असून कोंढवा हद्दीतील एकावर बेकायदेशीर गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेतयामध्ये लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील
अनिकेत गुलाब यादव, वय २२ वर्षे,( रा. जिल्हा परिषद शाळेच्या मागे, कदमवाकवस्ती) प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे, वय २१ वर्षे( रा. नायगाव रोड, चिंतामणी सोसायटीशेजारी, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे)
कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील
विश्वजीत भिमराव गायकवाड, वय ४० वर्षे, (रा. स.नं. १३/५. भिमनगर, कोंढवा खुर्द, पुणे) बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत
टोळी प्रमुख करीम सय्यदअली सौदागर उर्फ लाला, वय २९ वर्षे, (रा. स.नपं. ४२, मेट्रो टॉवर, २ रा मजला, फ्लॅट नं. २०२, कोंढवा खुर्द, पुणे) २) शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह, वय २५ वर्षे, (रा. भाग्योदयनगर, गल्ली नं. २२. जरीयावाला बिल्डींग, फ्लॅट नं. १३. एवन सुपर मार्केट शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे)
अझहर बशीर शेख, वय ३५ वर्षे,( रा. स.नं. ५४ शिवनेरीनगर, लेन नं. ३. फातीमा मस्जिदजवळ बैठेघर, कोंढवा, पुणे ) ४) अझहर इरफान सदस्य उर्फ अज्जु, वय २८ वर्षे, (रा. गल्ली नं. ३०, भाग्योदयनगर, मक्का मस्जिद गेट नं. २. कोंढवा खुर्द, पुणे)
वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील
१) राहुल उर्फ विकी रामु परदेशी, वय ३५ वर्षे, (रा. घ.नं. ५३२. नोबल बेकरीशेजारी, वानवडी गांव, पुणे) (टोळी प्रमुख) २) विशाल राजु सोनकर, वय २६ वर्षे,( रा. घ.नं. ५३२. नोबल बेकरीशेजारी, वानवडी गांव, पुणे ३) सुनिल रामु परदेशी, वय ३० वर्षे, रा. घ.नं. ५३२. नोबल बेकरीशेजारी, वानवडी गांव, पुणे) हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आता पर्यंत १६ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई केली तसेच १० मोका कारवाईमध्ये ६७ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले असून ३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण ११४ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली असल्याची माहिती
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ चे अधिकारी डॉ राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
