थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पै.दत्तात्रय ऊर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने थेऊर येथील सर्व अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळा आणि चिंतामणी विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय या शाळेतील तसेच इंग्लिश रेडियम स्कूल या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी गुणवंत शिक्षक यांचा शाल श्रीफळ तसेच ट्राफी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच गावातील दहावी बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन आलेल्या नंबरच्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांचा सन्मान आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला यावेळी दहावी तसेच बारावी मध्ये शाळेत नंबर प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आँनलाईन अडमिशन साठी अडचणी आल्या  व विद्यार्थी हुशार आहे परंतु अर्थिक

बाजू कमजोर आहे आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील ऍडमिशन साठी संस्थेचे चेअरमन मोरेश्वर काळे व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन किरण उंन्द्रे यांनी विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळून देण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे मान्य केले शाळेच्या संस्थेचे चेअरमन मोरेश्वर काळे तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन किरण उंन्द्रे यांचे उपस्थित विद्यार्थी तसेच पालकांकडून कौतुक करण्यात आले की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला व विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक धोरणासाठी एक मदतीचा हात पुढे केला समाजात जर असे मदत करणारे दानशूर लोक जर उभे राहिले तर चिखलातही कमळ फुलते याचे मूर्तिमंत उदाहरण थेऊर मध्ये उपस्थित होईल असे पालकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणीचे मुद्दे पर्यवेक्षक जीवन शिंदे यांनी व्यथा मांडल्या त्यांचे निरसन केले यासाठी शाळेने देखील दत्तात्रय काळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आबा काळे यांचे आभार मानले यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व आण्णासाहेब मगर शैक्षणिक स्मारक ट्रस्ट चे अध्यक्ष मोरेश्वर काळे, यशवंतचे व्हाइस चेअरमन किरण उंन्द्रे, संचालक विजय चौधरी, चंद्रकांत चौधरी, रामकृष्ण पतसंस्थाचे संचालक दत्तात्रय तांबे, विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनवणे,हवेली तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मेहेबूब शेख, शाळेचे मुख्याध्यापक राजाराम काकडे, इंग्लिश मेडियमचे मुख्याध्यापकी कुमोदिनी वाघमारे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवराचे आभार पर्यवेक्षक रोटे मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *