सातारा (हवेलीनामा वृतसमूह) साताऱ्यातील एका प्रेमाविराने सोमवारी दुपारी एकतर्फी प्रेमातून मुलीच्या गळ्याला चाकू लावून थरार उडवून दिला त्यानंतर त्या प्रेमवीरावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आर्यन चंद्रकांत वाघमळे (वय 18, रा. मोळाचा ओढा, सातारा) असे त्या प्रेमाविराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आर्यन याने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून ‘तू मला भेटत का नाही. माझ्याकडील तुझे फोटो व्हायरल करेन. आपण पळून जावू. तु आली नाही तर तुझा खून करेन,’ असे म्हणत धमकी देत मारहाण केली. या घटनेनंतर परिसरातील जमलेल्या नागरिकांनी व शहर पोलिसांनी मुलीची सुटका केली. त्यानंतर संतप्त जमावाने आर्यन याला चांगलाच चोप दिला. तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.
अलीकडे अशा घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे यांची एवढी हिम्मत कशी वाढली, कायद्याची भीती उरली नाही की काय अशी संतप्त प्रतिक्रिया पालक वर्गाकडून येत आहेत. शासनाने विशेषतः महिला आयोगाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालकांधील भीतीचे वातावरण घालवण्यासाठी योग्य व तत्पर कारवाई व्हावी असे पालकांचे म्हणणे आहे.
