थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) बंद घराचे कुलूप तोडून घरातील किमती मुद्देमालासह रोख रक्कम व मोबाईल फोन असा मुद्देमाल चोरट्याने पळवळ्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित गुन्हेगारास खंडवा मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पठारे वस्ती येथे राहणारे रहिवाशी शौकत शब्बीर मोगल हे आपल्या खाजगी कामा निमित्त बार्शी येथे गेले त्यानंतर दोन दिवसांनी घरी परतले असता घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले घरातील तिजोरी तोडून त्यातील सोन्याचे दागिने रोख रक्कम तसेच एक मोबाईल फोन असा मुद्देमाल चोरट्याने लांबवला याची तक्रार त्यांनी लोणी काळभोर पोलिसात दाखल केली.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी तपास पथकाची नियुक्ती केली यातील अंमलदार पोलीस शिपाई पाटील व कुदळे यांना माहिती मिळाली की ही चोरी मध्य प्रदेश खंडवा येथील प्रतिक हिराचंद लिडकर वय ३१ रा. शिवमंदिर शेजारी, रामनगर नावाच्या व्यक्तीने केली आहे यावर लोणी काळभोर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे एक तपास पथक मध्य प्रदेश येथील खंडवा येथे पाठविले त्या ठिकाणी सापळा रचून त्या स ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून पोलीस कोठडी दरम्यान तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांनी चोरीस गेलेला एकूण किंमत सहा लाख 39 हजार 900 रुपये तितका मुद्देमाल हस्तगत केला.

अटकेत असलेल्या गुन्हेगारावर मध्य प्रदेश व महाराष्ट्रात चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासारखे एकूण 15गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो. हवा. सातपुते, पो. हवा. वणवे, पो. हवा. भोसले, पो. हवा. माने, पो. हवा. जगदाळे, पो. हवा. देवीकर, पो. शि. विर, पो. शि. पाटील, पो. शि. कुदळे, पो. शि. कुंभार, पो. शि. गाडे, पो. शि. कर्डीले, पो. शि. सोनवणे, पो. शि. शिरगिरे, पो. शि. दडस, म.पो.शि. थोरात यांनी तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे कार्यालयास नेमणुकीस असलेले पो. शि. अमोल जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *