थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर येथील मुळा मुठा नदीवर आज मोठा अनर्थ टळला हटकेश्वर ट्रान्सपोर्ट नावाने सिमेंट वाहतूक करणारा मालवाहू आयशर टेम्पो क्र MH 12 KP 8567 हा कोलवडीच्या बाजूने थेऊरकडे येत असताना चालक याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पूलच्या मध्यभागी येऊन वाहनाचा निम्मा भाग आधांतरी व निम्मा भाग पुलावर अशा अवस्थेत अडकून पडला यावेळी प्रत्यक्षदर्शीने ही बाब थेऊर पोलीस चौकीला कळवली असता चौकीमध्ये पोलीस शिपाई प्रशांत सुतार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस हवलदार वैशाली नागवडे यांना याची कल्पना दिली यावर राहुल माळगे सागर कदम,दिलीप दराडे हे तत्काळ घटनास्थळाकडे धावले. आणि वाहतूक सुरळीत केली यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु या घटनेत पुलाच्या कठड्याचे नुकसान झाले असून या ठिकाणी प्रत्यक्षदर्शीच्या मते आयशर टेम्पोवरील चालक हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता गाडी पुलावर गुंतल्यावर त्याने तत्काळ उडी मारून निघून गेला.घटनेची माहिती पोलीसांना दिली नाही.

या पुलाचे नुकसान झाले असून कठड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अन्यथा मोठी अपघात होण्याची शक्यता आहे कारण या पुलावर लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी नागरिक करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *