पुणे (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त 66 हजार लक्ष्मी तरु वृक्ष लागवड शाश्वत विकास फाउंडेशन व आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हात “अजित वृक्ष योग आरोग्य महोत्सव 2025″ राबविण्यात येत असून ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचे हाती घेतले आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृक्ष लागवड व संगोपन चे समन्वयक तसेच आर्ट ऑफ लिविंगचे योग शिक्षक प्रभाकर जगताप यांनी दिली.

या मोहिमे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण तसेच पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे शालेय जीवनापासून आरोग्य योग याची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना योगाचे धडे देण्याचा मानस आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून केला जाणार आहे एक विद्यार्थी एक वृक्ष यातून प्रत्येक विद्यार्थी आपल्या परिसरात लक्ष्मी तरु हा वृक्ष लावेल या वृक्षापासून कॅन्सर सारख्या भयानक आजारापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होणार आहे.

शाश्वत विकास फाउंडेशन व आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून यावर्षी हाती घेतलेला हा उपक्रम पुढील वर्षी यामध्ये वाढ करून 11 लाख लक्ष्मी तरु वृक्ष लागवड संपूर्ण राज्यात करण्याचा मानस आहे.या उपक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांना लक्ष्मी तरु वृक्ष देऊन करण्यात आली,यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *