पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांच्या दौऱ्यात शुक्रवारी वाघोलीत विविध पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश झाला.वाघोली नुकतेच महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने महानगरपालिका निवडणूक बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध उपक्रम हाती घेऊन नागरिकापर्यंत पोहोचवले जात आहे.
         यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार  व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे नेतृत्वात वाघोली चे  माजी उपसरपंच समीर भाडळे, उपसरपंच महेंद्र भाडळे,ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, ग्रामपंचायत सदस्या वंदनाताई दाभाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद भाडळे,  चैतन्य सातव, उद्योजक सागर जाधव, निखिल भाडळे, संतोष तांबे, भारत सातव, दिलीप काळे, लखन भाडळे, दीपक बढे, विशाल शिंदे, रोहित शिंदे, सनी अन्सारी,  सचिन नवले, अतुल बनकर, प्रमोद( जाधव) भाडळे, युवराज भाडळे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *