tempo driver kicked a person to death
पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  वाकड पोलिसांनी नऊ दिवसापासून खुन करुन फरार असलेल्या सराईत इसमास पाठलाग करुन केले जेरबंद  आरोपीस  ४८ तासांत उस्मानाबाद मधुन अटक वाकड पोलीस तपास पथकाची कारवाई केली.
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२३ सप्टेंबर रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत डांगे चौकात असलेले रॉयल केट्री वाईन्स शेजारी
 रोहन दिलीप कांबळे, वय ३० वर्ष, रा.लक्ष्मी मंदिराजवळ, चांदणी चौक, धायरीगाव, पुणे हा मयत अवस्थेत पडलेला होता वाकड पोलिसांनी  घटनास्थळी जावुन पाहणी केली असता मयत व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात सिमेंटचा गटु व दगड मारुन खुन केला आहे असे निष्पन्न झाले. सदर घटनेबाबत  अज्ञात व्यक्तीविरोधात  वाकड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घडलेल्या घटनेचे गांभिर्य ओळखुन पिंपरी चिचंवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वरिष्ठ  पोलिस निरिक्षक  विवेक मुगळीकर  यांना  गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन आरोपीला अटक करणे बाबत आदेश दिले त्याप्रमाणे डॉ.विवेक मुगळीकर यांनी तपासाची चक्रे फिरवत वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाचे तीन वेगवेगळे पथक तयार करुन गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या.सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष पाटील त्यांच्या  पथकातील अंमलदारांनी घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यामधुन दोन संशयित इसमांची गुन्हा घडलेल्या  ठिकाणच्या हालचालीवरुन त्यांनीच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले
.       प्राथमिक माहितीवरून यातील दोन इसमांची नावे अविनाश व हाजमलंग असल्याचे कळाले.
साक्षीदारामार्फत त्यांचेवाबत सविस्तर माहीती प्राप्त करत असताना हाजमलंग याचे मयत रोहन कांबळे  सोबत काही दिवसांपु्वी भांडण झालेचे समोर आले. त्यामुळे गुन्हयातील मुख्य आरोपी हाजमलंग असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हयातील मुख्य आरोपी हाजमलंग हा मोबाईल वापरत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या त्यामुळे तयार करण्यात आलेल्या तपास पधकातील एक पथक हाजमलेंग याचे मुळ गाव असणारे इटकळ तुळजापुर जि.उस्मानाबाद येथे थांबुन होते. त्यांना सदरचा आरोपी राजी उशीरा गावात येणार असल्याचीो माहीती प्राप्त झालेवरुन सपोफी राजेंद्र काळे, पोना.बंदु गिरे, पोना.प्रशांत गिलबीले असे सापळा रचुन थांबले असता, आरोपी हाजमलंग यास त्याबाबत चाहुल लागली व तो उसाचे शेतात पळुन जावून लपुन बसला. पोलीस पथकातील सपोनि.राजेंद्र काळे,पोना कंदु गिरे, पोना प्रशांत  गिलबीले यांनी राञीच्या अंधारात साहसपूर्ण आरोपीचा पाठलाग करत गुन्हयातील मुख्य आरोपी हाजमलंग हुसेनबाशा सिदेंडे रा.कोयलेवर्ती पुनावळे पुणे मुळ रा. पाटीलवस्ती इटकज ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मयत व्यक्ती रोहन दिलीप कांबळे  बरोबर जुन्या भांडणातुन शिवीगाळ केल्याने त्याने त्याचा साथीदार  अविनाश गायकवाड याचे मदतीने त्याचा खुन केला असल्याचे सांगितले
         सदरची कारवाई  पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश,अप्पर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे  पोलिस उपआयुक्त परिमंडल२.आनंद भोईटे सहाय्यक पोलिस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ.विवेक मुगळीकर, सपोनि संतोष पाटील, पोलीस अंमलदार विभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, बापू धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, जावेद पठाण, नंदु गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबोले, तात्या शिंदे, कॉन्तेय खराडे,
कल्पेश पाटील यांनी मिळून केली आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *