पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) महसूल विभागाच्यावतीने स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन महसूल विभाग तर्फे मोफत डिजीटल ७/१२ वाटपाचे निर्देश देण्यात आले होते.
याअनुषंगाने जिल्हाधिकारी पुणे यांचे मार्गदर्शनात हवेली तालुक्यात मोफत डिजीटल ७/१२ वाटप,सामाजिक अर्थसहाय्य योजना,रेशनबाबत कामकाज,कृषि विभाग व ग्रामविकास योजना “शासन आपल्या दारी” आशा स्वरुपात राबविण्यात आले.
पूर्व हवेलीतील साष्टे व प्रयागधाम येथे स्थानिक आमदार अशोक पवार यांचे प्रमुख उपस्थितीत व संजय आसवले उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. शासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी सजगतेने व तत्परतेने लोकांच्या अडचणी सोडवाव्यात असे आवाहान आमदार यांनी भाषनातून केले. यावेळी उपस्थित शेतकरी खातेदार यांना ७/१२ वाटप,.रेशनकार्ड दुरुस्त्या,सामाजिक अर्थ सहाय्य योजना,तक्रारींच शंका समाधान करण्यात आले. मारुती साळे तालुका कृषि अधिकारी हवेली यांनी आपल्या योजनांची माहिती उपस्थित शेतकरी यांना दिली. आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी ठेवणेत आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन अपर तहसिलदार विजयकुमार चोबे,.मंडळ अधिकारी गौरी तेलंग व नुरजहान सय्यद,तलाठी, दिवटे, सविता काळे, कनिचे, जळळकर, गवारी, सुधीर जायभाय, दादासाहेब झेंडे यांनी केले होते. कार्यक्रमाबाबत उपस्थित शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले.
