थेऊर:(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर येथे सोमवारी होणार लोकशाही दिन कार्यक्रम शासनाच्या १००दिवसांचा कृती आराखडा व महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी येत्या सोमवार दिनांक 19मे रोजी आशीर्वाद बँक्वेट हॉल थेऊर रोड
 येथे ‘लोकशाही दिन कार्यक्रम’ होणार आहे.शिरूर हवेली चे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत थेऊर येथील आशीर्वाद बँक्वेट हॉल थेऊर रोड सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, गटविकास अधिकारी भूषण जोशी, पोलिस निरिक्षक राजेंद्र पन्हाळे आदींसह विविध अधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडल अधिकारी किशोर जाधव,ग्राम महसूल अधिकारी सरला पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *