पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैर फायदा घेवून दागिणे चोरनारा सराईत युनिट ६ कडुन गजाआड करण्यात आला त्याच्याकडून आठ गुन्हे उघड करून त्यांचेकडून ९६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण कि.रु ७,६८,०००/-रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला.
वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी युनिट ६ कडुन प्रयत्न सुरु असताना युनीटचे अंमलदार पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, यांना मिळालेल्या गोपनिय बातमी नुसार पोलीस बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांचे दुर्बलतेचा गैर फायदा घेवून दागिणे चोरनारा हमीद अफसर खान वय ३० वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, यास मोटार सायकल सह लोणीकाळभोर गाव स्मशानभुमी येथुन ताब्यात घेवून गुन्हे शाखा, युनिट ६ येथील कार्यालयामध्ये घेवुन येवुन त्याचेकडे चौकशी करता, त्याने व त्याचे साथीदार सह पुणे शहर व आजुबाजुच्या परिसरामध्ये हातचलाखीने फसवणुक करुन चोरी केल्याचे मान्य केले.

कोंढवा पर्वती सिंहगड कोथरुड भारती विद्यापीठ सासवड या पोलीस स्टेशन मधील दाखल गुन्हे उघडकीस आले. यामध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे सोन्याचे दागिने एकुण ९६ ग्रॅम वजनाचे एकुण कि.रु ७,६८,०००/-रुपये तसेच १,००,०००/- रु.किंमतीची एक काळ्या रंगाची टीव्हीएस कंपनीचे अपाचे RTR 200 मोटार सायकल असा एकुण ८ फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ८,६८,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अमंलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती नरवडे, यांनी केली आहे.
