फुरसुंगी -(हवेलीनामा वृत्तसेवा) फुरसुंगी पोलिसांनी दोन अट्टल चोरटयांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख ५४हजार (६,५४,०००/-) रुपये किंमतीचा चोरी केलेल्या मुद्देमालासह चोरी करण्यासाठी वापरलेला पिकअप टेम्पो हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील उरुळी देवाची येथील गोडावून मधून दोन ते तीन अनोळखी इसमांनी गोडावुनच्या कंपाऊंड भिंतीच्या बाजुने लावलेला पत्रा उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन गोडावुन मधील मोकळ्या जागेत ठेवलेले इलेक्ट्रीकल सर्किट ब्रेकर, कॉम्प्युटर चिप्स, मदर बोर्ड, इलेक्ट्रीकल मिटर, ट्रान्सफॉर्मर या साहित्यामधुन इलेक्ट्रीकल सर्किट ब्रेकर, कॉम्प्युटर चिप्स, मदर बोर्ड, इलेक्ट्रीकल मिटर, ट्रान्सफॉर्मरचे साहित्य असे एकुण ४०,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की गोडावुन मधील लोखंड व इतर वस्तुची चोरी करणारे दोन संशयीत काळेपडळ परीसरात रहात असल्याची माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता मुकुंद बाळु शिंदे (वय २६ वर्षे, रा. लेन नं.०६ शिवतेज नगर काळेपडळ, हडपसर पुणे मुळ गाव.मु. पो. टाकेमळा लोणीकाळभोर, ता. हवेली), संतोष शिवाजी पवार (वय २५ वर्षे, रा.लेन नं.०६ शिवतेज नगर काळेपडळ, हडपसर पुणे मुळ गाव. बोरीपार्धी केडगाव, ता. दौण्ड) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून १,०४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल व चोरीसाठी वापरलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप असा एकुण ६,५४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मंगल मोढवे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश खांडे, पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार सतिश काळे, हरिदास कदम, नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हेमंत कामठे यांनी केली.
