थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत तरडे गावच्या हद्दीत एका व्यक्तीला अवैध देशी विदेशी दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले असून एकुण २५८५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थेऊर पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या तरडे गावातील बी पी सी एल कंपनीच्या मागे हाँटेल निसर्गच्या बाजूला सुनील दत्तात्रय काळभोर आपल्या ओळखीचे लोकांना देशी विदेशी दारू विकत असल्याची माहिती मिळाल्या नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार,दिगंबर सोनटक्के पोलीस हवालदार चंद्रकांत माने, विजय जाधव,बनकर पोलीस अंमलदार तौसिफ़ सय्यद यांनी तेथे धाड टाकली.

त्याठिकाणी सुनिल दत्ताञय काळभोर वय ४२ वर्षे धंदा हॉटेल व्यवसाय रा. तरवडीमळा लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे यांस ताब्यात घेऊन जागीच पंचासमक्ष तपासले असता त्याच्या ताब्यात १) १६८०/- रुपये किंमतीचे टॅगोपंच कंपनीचे १८० मी.ली मापाचे एकुण २४ बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत ७० रुपये, २) ४०५/- रुपये किंमतीचे आफीसर चॉईस कंपनीचे १८० मी.ली मापाचे एकुण ०३ बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत १३५ रुपये. ३) १६०/- रुपये किंमतीचे मॅगडॉल्स नं. १ कंपनीचे १८० मी.ली मापाचे एकुण ०१ बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत १६० रुपये, ४) ३४०/- रुपये किंमतीचे मॅगडॉल्स नं. १ कंपनीचे ९० मी.ली मापाचे एकुण ०४ बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत ८५ रुपये. असे एकुण २५८५/- मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने हे करीत आहेत
परिसरातील सर्व अवैध्य धंदे चालकांचे अवैध्य धंदे व अनाधिकृत कृत्यांना चांगलाच चाफ बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध्य धंदयांचे समूळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

