कुंजीरवाडी -(हवेलीनामा वृत्तसेवा) कुंजीरवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती रुपेश उघाडे युवा मंच व  कुंजीरवाडी ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा सामाजिक पत्रकारिता यासाठी आयोजकांच्या वतीने या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप महिला आघाडीच्या पुनम चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून  लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे होते.
          प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव सेनेचे  स्वप्निल कुंजीर, दैनिक पुढारी चे पत्रकार सिताराम लांडगे,परिवर्तन सेनेचे अमोल लोंढे,बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट, रिपाई चे शक्ती बडेकर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संजय भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट योगेश काकडे, कुंजीरवाडी चे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, डाळिंब उत्पादक संघाचे गोरख घुले, बिवरी गावचे उद्योजक नितीन गोते, मातंग एकता आंदोलनाचे दिगंबर जोगदंड, पत्रकार हनुमंत सुरवसे , बिवरी गावच्या विद्यमान सरपंच उत्कर्षा गोते, सकाळच्या पत्रकार सुवर्णा कांचन रेखा तुपे, अंबिका थिटे उपस्थित होत्या.
       लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  जयंती महोत्सवाचे मुख्य संयोजक सहदेव खंडागळे व रुपेश उघाडे यांनी जयंती सोहळ्याच्या आयोजन केले होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  रुपेश उघाडे , अमोल गोडगे , अनिरुद्ध दोडे, निखिल कुंजीर, राजू गायकवाड, निलेश पायगुडे, मोहन उकिरडे यांनी  परिश्रम घेतले.
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीकडून देण्यात आलेले पुरस्कार :
 दत्तात्रेय उर्फ बाळासाहेब चौधरी
 सांप्रदायिक क्षेत्र, सुवर्णा कांचन
पत्रकारिता, शरद पुजारी,विजय रणदिवे,सचिन धुमाळ पत्रकारिता,  देविदास कुंजीर आरोग्य दूत, डॉ. मेहबूब लुकडे
आरोग्यसेवा,  नूतन स्वप्नील कुंजीर
महिला सक्षमीकरण, योगेश काकडे
कृषी क्षेत्र, दिपालीताई काटकर
 आदर्श शिक्षिका,मयूर काळे
 युवा उद्योजक, अमोल गोडगे
 युवा उद्योजक, निखिल कुंजीर
 आदर्श शिक्षक, अनिरुद्ध दोडे
सामाजिक क्षेत्र, अश्विनी शिंदे
 आदर्श शिक्षिका, श्याम शेठ यादव युवा उद्योजक, भाऊसाहेब महाडिक
(आदर्श क्रीडा शिक्षक), प्रसाद नाळे
(युवा उद्योजक), सिद्धार्थ शंकर गायकवाड
बौद्धाचार्य यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *