हडपसर-(हवेलीनामा वृत्तसेवा) फुरसुंगी पोलिसांकडून अवैध धंद्यावर धडक कारवाई करत वडकी येथे ५३हजार (५३८४०/- )रुपये किंमतीची देशी विदेशी दारु हस्तगत करण्यात आली. यात प्रताप प्रभाकर कुदळे, (वय ३३ वर्षे, रा. वडकीनाला, ता. हवेली) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडकीनाला येथील बांधकाम चालू असलेल्या खोलीचे आवारात अवैध देशी विदेशी दारु विक्री होत असल्याबद्दल गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी छापा टाकला त्याठिकाणी प्रताप प्रभाकर कुदळे, (वय ३३ वर्षे, रा. वडकीनाला, ता. हवेली) हा देशी विदेशी दारु विक्री करत होता.
१४एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शासनाकडून मद्यविक्री बंदी होती तरीही कुदळे बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारु विक्री करत होता त्यास ताब्यात घऊन त्यांच्याकडील विविध कंपनीच्या देशी विदेशी दारुच्या १०३२ बाटल्या व रोख रक्कम ४,२००/- रुपये असा एकूण ५३८४०/- मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगल मोढवे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार सतिश काळे, हरिदास कदम, सागर वणवे, नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, बिभीशन कुंटेवाड, हेमंत कामठे, चेतन साळुंखे यांनी केली असून पुढील तपास फुरसुंगी पोलिस करत आहे.
