पुणे (हवेलीनामा वृतसमूह ) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येत असलेल्या पिंपरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांनी गुन्ह्यातील वाहन सोडविण्यासाठी 40 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलोचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांनी पंचा समक्ष तीस हजारांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्ह्या दाखल असून त्यांना यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्यासाठी लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे यांनी ४०,०००/- रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार दि. ११/०४/२०२५ रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ११/०४/२०२५ व दि. १२/०४/२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक निलेश बोकेफोडे यांनी गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी सुरुवातीस ४०,००० रुपयाची लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती ३०,००० रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

आज दि. १५/०४/२०२५ रोजी निलेश बोकेफोडे यांनी पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत मोहन नगर पोलीस चौकी येथे ३०,००० (तीस हजार) रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचे विरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *