थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती निमित्त थेऊर येथील ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय राज्य घटनेचे शिल्पकर डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपसरपंच दत्तात्रय कृष्णाजी कुंजीर यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी थेऊरगावचे उपसरपंच आप्पासाहेब काळे,हवेली तालुका आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे, ग्रामसेवक तुकाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, राहूल कांबळे,गौतमी कांबळे,संजय कुंजीर,संतोष ओव्हाळ, तुकाराम चव्हाण, सुरेश कांबळे, गणेश रसाळ,सुनिल साळुंखे,परसूराम कांबळे,मोहन चव्हाण, एकनाथ जगताप,प्रकाश आळंदे,आण्णा वाल्हेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कल्पतरू, नवनिर्माण, मैत्री महिला ग्रामसंघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांचे महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
