पुणे (हवेलीनामा वृतसमूह) वाघोली पोलीस स्टेशन मधील सराईत महिला छकुली राहुल सुकळे रा. वाघेश्वरनगर गायरान वस्ती वाघोली, हिला पुणे जिल्ह्यातुन ०१ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

वाघोली पोलीस स्टेशन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री, पोलीसांच्या रखवालीतुन पळुन जाणे, उघडयावर चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तिच्या विरुद्ध दाखल होते. तीने वाघोली व आसपासचे परीसरामध्ये दहशत निर्माण केल्याने परिसरातील रहिवासी दडपणाखाली वावरत होते. लोकांच्या जीवितास, मालमत्तेस व शारीरिक स्वास्थास धोका निर्माण करणा-या रेकॉर्डवरील महिलेच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

त्यामुळे या महिलेवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंडीत रजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे यांनी सदर रेकॉर्डवरील महिला हिचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर महिलेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम५६ (१) (अ) प्रमाणे तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविला असता या महिलेस संपुर्ण पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे.

यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोणी अवैध धंदे केल्यास किंवा संघटीत स्वरुपात गुन्हे करुन दहशत निर्माण केल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेऊन अशा प्रकारच्या कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परि-४ पुणे शहर, हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्राजंली सोनवणे, तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, परि. म.पो.उप. सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, अमोल गायकवाड, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रितम वाघ, समीर बोरडे, मंगेश जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *