थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कारवाई चा फास आवळल्यानंतर दिखील काही ठिकाणी आडोश्याचा आश्रय घेऊन धंदे चालवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत परंतु यांची माहिती काढून त्यावर ताबडतोब कारवाई करण्याचा बडगा उगारला जातोय.या धंद्याचा मुख्य सूत्रधार शोधून त्यावर कारवाई झाली तर याला मोठा आळा बसु शकेल.

नुकतीच लोणी काळभोर पोलीसांनी थेऊर रेल्वे उडानपुल येथे सोरट, पनती पकोळी या जुगारावर कारवाई केली येथील कारवाईत दोन जण अटकेत असून जवळपास 82580 रुपये जप्त करण्यात आले. यात राजेभाऊ शेषराव मुसळे व राम राजेंद्र गिरे यांना अटक झाली.

तसेच लोणीस्टेशन परिसरात मटक्यावर कारवाई करत दतात्रय नवनाथ मोहोळकर रा. म्हातोबाआळंदी ता. हवेली २) तात्याराम महादेव ससाणे रा. माळीमळा, लोणीकाळभोर यांना अटक केली आहे.

 

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के,उप निरीक्षक बोबडे, सहायक पोलीस फौजदार कांबळे, पोलीस हवालदार महेश चव्हाण,रवि आहेर,पोलीस शिपाई मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे, संदिप धुमाळ यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *