सोरतापवाडी (हवेलीनामा वृत्तसेवा) हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अध्यक्षपदी सोरतापवाडी येथील अमोल बाळू चौधरी यांची निवड करण्यात आली.त्याना निवडीचे पत्र शिरूर हवेली चे आमदार ज्ञानेश्वर कटके,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाडीक हस्ते देण्यात आले.यावेळी नायगाव पेठचे माजी सरपंच सूरज चौधरी, युवा नेते सुजित चौधरी,कैलास (नानासाहेब) चोरघे, अमर चव्हाण तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये नव युवकांचे संघटन करुन पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले असून त्यांच्या निवडीचे परिसरात स्वागत होत आहे.
