थेऊरः(हवेलीनामा वृत्तसेवा) प्रभू रामचंद्र की जय  जय श्री राम अष्टविनायकपैकी एक असलेल्या थेऊर (ता.हवेली) येथील चिंतामणी मंदीरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विष्णू लक्ष्मी मंदीरचे पुजारी मंगलमूर्ती पोपळे,केदार पोपळे यांनी विधिवत पुजा केली सकाळपासून गावातील चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाने हरीनामाचा जप करीत भजन करुन उपस्थित रामभक्तांना मंत्रमुग्ध केले दुपारी साडेबारा वाजता रामजन्मानिमित्तानं पाळणा हलवून महिलांनी पाळणा गीत गायन करुन महाआरती करुन रामजन्मोत्सव साजरा केला यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री प्रभू रामचंद्राच्या नामाचा जयघोष केला यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद चिंतामणी ग्रामविकास प्रतिष्ठाण वतीने देण्यात आला चिंतामणीचे पुजारी आगलावे बंधू यांनी सरबत तसेच विविध फळे, सुंठवडा, प्रसादाचे वाटप केले. यावेळी साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,माजी विश्वस्त दत्तात्रय कुंजीर, स्वराज्य संघाचे अध्यक्ष ज्ञानोंबा कुंजीर, उपसरपंच आप्पासाहेब काळे,नितिन कुंजीर, विश्वनाथ तांबे, नरसिंग सुरवसे,गोविंद तारु,सजंय कुंजीर,एकनाथ काळे, विठ्ठल कुंजीर, सदाशिव कुंजीर, शिवाजी कुंजीर,आनंदा काकडे, शांताराम कंदशोभा कोतवाल, तसेच गावातील ग्रामस्थ महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांनी जय श्री राम प्रभू रामचंद्र की जय नामाचा गजर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *