अक्कलकोट : (हवेलीनामा वृत्तसेवा) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सामाजिक, संस्कृती, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्थाना मदत, आरोग्यविषयक आदी राबवीत असलेले उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, सोलापूर यांनी व्यक्त केले ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोटचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम.एम. कल्याणकर, सहप्रथम न्याय दंडाधिकारी श्रीमती एन.ए.एल.शेख, न्यासाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. संतोष खोबरे, न्यायालीन लिपिक स्वप्नील मोरे, पो.ह. अशोक जमादार आणि सोलापूर न्यायालीन कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, सोलापूर यांनी न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. या बरोबरच समर्थ वाटिकेची पाहणी केले, महाप्रसाद गृहाची पाहणी करून नियोजनाची माहिती घेऊन अन्नछत्र मंडळाच्या चौफेर कार्याचे कौतुक केले.
यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, बाबुशा महिंद्रकर, अमित थोरात, स्वामिनाथ बाबर, श्री चव्हाण, गोरख माळी, गणेश पाटील, नामा भोसले, सतीश महिंद्रकर, राजेंद्र काटकर, शहाजी यादव, बाळासाहेब घाडगे, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शावरेप्पा माणकोजी, कल्याणराव देशमुख, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
