पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या विनयभंग गुन्ह्याचा तपास 24 तासात पुर्ण करुन दोषारोप तयार करून न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्या आरोपीस दहा हजार रुपयाच्या दांडाची तर तक्रारदारास पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली.
लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील कोलवडी येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारा एक जण सोसायटी मधे राहणाऱ्या महिलांना फोन करून त्रास देणे अश्लील शेरेबाजी करणे तसेच गॅलरीत अंडरवेअर वर उभे राहणे अशा अशयाची तक्रार सोसायटी मधील राहणाऱ्या महिलांकडून मिळाल्यानंतर या गुन्ह्याचा तातडीने तपास करुन कागदपत्रांसह दाखल गुन्ह्याचा तात्काळ 24 तासात तपास पूर्ण करून दिनांक 25/03/ 2025 रोजी दोषारोप शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले.
यातील फिर्यादी साक्षीदार न्यायालयात साक्ष कामी हजर झाल्यानंतर न्यायालयाने 24 तासात केस चालवून व आरोपीने केलेला गुन्हा कबूल केल्याने सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी सिद्धेश्वर बिरादार , वय 30 वर्ष रा कोलवडी यास 10,000 रुपये दंड ,कोर्ट उठेपर्यंत न जाण्याची शिक्षा व फिर्यादी यांना नुकसान भरपाई म्हणून 5000 रुपये तसेच दंड न भरल्यास 11 दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास डीसीपी झोन 4 हिम्मत जाधव एसीपी प्रांजली सोनवणे येरवडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार लोणीकंद पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया पंडित वंजारी यांनी केला असून सहकार्य पोलीस शिपाई आशिष लोहार, विठ्ठल केदारी यांनी केले.
