थेऊर(हवेलीनामा वृत्तसेवा) चिंतामणी सहकारी गृहरचना संस्थेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सकाळी स्वामी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची फुग्यांची आरास करुन नेत्रदीपक रांगोळी काढण्यात आली होती. श्रींच्या मूर्तीची विधिवत पूजा अभिषेक करून होमहवन करण्यात आला दुपारी थेऊर येथील चिंतामणी भजनी मंडळ यांनी भजन केले.
संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाचे पालखीतून वाजातगाजात ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्यदिव्य मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब काळे, लक्ष्मण शितोळे, चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त आनंद तांबे,शरद पुजारी,अरुण सरोदे,शंतनू गोगावले, आकाश बधे,उमेशकाका विध्वंस, विजय काळे,नंदू अविनाशे, लालूप्रसाद गुप्ता गावातील स्वामीभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संध्याकाळी महाआरती होऊन स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
