पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुंजीरवाडीतील गाढवे मळा येथे क्रेटा कार आणि थार जीपमधून आलिशान गाड्यातून येऊन तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यात क्रेटा कार व थार जीप सह २५ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार पोलिसांनी उमेश ऊर्फ टका निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. बेटवस्ती, गाढवे मळा, ता. हवेली), अक्षय राजेंद्र चौधरी (वय २६, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), शाम वामन गायकवाड (वय ४७, रा. कोलवडी, ता. हवेली), ऋतिक राजेंद्र जाधव (वय २०, रा. जाधववस्ती, थेऊर, ता. हवेली), देवराम ज्ञानोबा गायकवाड (वय ३६, रा. कोलवडी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून गेले. ही घटना कुंजीरवाडी गावातील गाढवे मळा येथे रविवारी रात्री पावणेआठ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, सोनटक्के, हवालदार जोगदंड, आहेर, पोलीस अंमलदार ढमढेरे, माळी आणि अजिंक्य जोजारे हे पुणे सोलापूर महामार्गांवर थेऊर फाटा येथे गस्तीवर असताना पोलीस हवालदार जोगदंड व आहेर यांना माहिती मिळाली की, कुंजीरवाडी येथील गाढवे मळा येथील माऊली राखपसरे यांच्या घरासमोर काही जण तीन पत्ती जुगार पैसे लावून खेळत असताना पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच दोघे जण शेतात पळून गेले.तर पाच जण सापडले. यात जुगाराचे साहित्य, रोकड व क्रेटा थारसह वाहने असा २५ लाख १६ हजार रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *