वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा) गुन्हे शाखा युनिट ६ कडुन घरफोडी व वाहन चोरी करणारी बहुचर्चित बारक्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी यूनिट सहाने कंबर कसली असतानाच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नितिन मुंडे व कारखेले यांनी पृथ्वीराज ऊर्फ साहील संतोष आव्हाड (वय १९ वर्षे, रा. हडपसर गंगानगर, फुरसुंगी ),
आनंद उत्तरेश्वर लोंढे (वय ३४ वर्षे धंदा, रिक्षाचालक रा. कामठे वस्ती, राजगे आळी),
आर्यन कैलास आगलावे( वय १८ वर्षे, धंदा मजुरी, रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, कात्रज) कुलदीप गणपत सोनवणे( वय १९ वर्षे, रा. शेवाळवाडी, हडपसर)
एक विधी संघर्षित बालक, (वय १७ वर्षे)
यांना ताब्यात घेऊन पुणे शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले यामध्ये वेगवेगळया वर्णनाचे सोन्याचे दागिने व सोन्याची लगड एकुण १२९ ग्रॅम तसेच २ किलो वजनाच्या चांदीच्या विटा असा११लाख९१,९२०रूपयांचा मुद्देमाल वेगवेगळया कंपनीच्या ४ मोटार सायकल एकुण किं. रू. २लाख ४०हजार रुपये असा ४वाहन चोरीचे गुन्हे व २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून तब्बल १४ लाख३१,९२०रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.
