पुणे (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर येथील प्रसाद सुभाष सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आबा काळे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर तसेच जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड करण कोकणे उपस्थित होते.

प्रसाद सोनवणे हे गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवेली तालुका विद्यार्थी सेनेचे कर्तव्य तत्पर सभासद होते. परंतु त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राज्यात महायुती सरकार प्रस्थापित झाल्यानंतर सर्वत्र विकासाची गंगा सर्व सामान्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करत असताना महायुतीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विचारसरणीतून राज्याची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे विचारसरणी सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचे कार्य येत्या काळात आपण करणार असल्याची प्रतिक्रिया प्रसाद सोनवणे यांनी दिली. विशेषतः हवेली तालुक्यामध्ये तरुणांमध्ये कामाचा उत्साह निर्माण करून सर्वसामान्य जनतेची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *