पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने शंकरशेठ रस्त्यावरील हॅण्डल्युम हाऊस शॉपच्या समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून सुमारे बारा लाखाचा साठ किलो गांजा जप्त केला.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्तीवर असताना हॅण्डल्युम हाऊस शॉपच्या समोर, शंकरशेठ रोड, स्वारगेट पुणे सार्वजनीक रस्त्यावर नदिम मोईज शेख वय २८ वर्षे, रा. जुना मायलोर, हनुमान मंदिरा जवळ, बिदर, कर्नाटक, हा आपल्या स्विफ्ट डिझायर गाडी मध्ये संशयस्पदरित्या बसलेला आढळला. त्याची झडती घेतली असता गाडीच्या डिक्की मध्ये १२,००,७४०/- कि.चा चार नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेला ३० पॅकेट असा एकुण ६० किलो ०६७ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला, मालासह स्विफ्ट डिझायर गाडी व मोबाईल असा एकुण १७,१०,४४०/- रु. किं मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याच्या विरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो. आयुक्त, गुन्हे २ राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर संदेश काकडे, दत्ताराम जाधव, यांनी केली आहे.
