वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा) वाघोली पोलिसांची कोयता गँगवरचा टोळी प्रमुख रोहन गिरी टोळीवर कारवाई गिरीसह तीन जणांना दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातुन केले तडीपार.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
वाघोली पोलीस स्टेशन मधील रेकॉर्डवरील कुख्यात गुंड रोहन ऊर्फ मोन्या रामप्यारे गिरी (वय. २० वर्षे रा. सुयोगनगर भावडी रोड ०४ नंबर, वाघोली ता. हवेली) विकास राजु जाधव (वय. २० वर्षे, रा. कैलास सातव यांच्या खोलीत भाडयाने समानाध पोहे हॉटेलच्या मागे केसनंद फाटा वाघोली ता. हवेली) आदित्य दिपक कांबळे (वय. १८ वर्षे सुखकर्ता मेडिकच्या वर सिध्दीविनायक पार्क वाघोली ता. हवेली) वैभव सुभाष पोळ (वय. १८ वर्षे रा. जय मल्हार पानशॉपचे पाठीमागे बी.जी.एस. फाटयाचे जवळ वाघोली ता. हवेली) यांना पुणे जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता तडीपार केले.
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नगर रोड, वाघोली, बकोरी फाटा वाघोली बाजारतळ तसेच आसपासच्या भागात कोयत्याच्या साहाय्याने दहशत माजवुन गंभीर दुखापत करुन तोडफोड करणे लोकांना कायम दहशतीखाली ठेवुन त्यांना वारंवार त्रास देणाऱ्या गुन्हेगारांच्या दहशती खाली परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसवा यासाठी सराईत टोळीप्रमुख व त्यांच्या साथीदारांवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्याबाबत पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांना प्रस्ताव पाठविला असता या सराईत टोळीस पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोयत्याच्या साहाय्याने किंवा सोशल मिडीयाचा वापर करुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेऊन अशा प्रकारच्या कारवाईंची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, दर्शन देवगडे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रितम वाघ, गहिनीनाथ बोयणे, समीर बोरडे यांनी केली आहे.
