लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलीसांनी गांजा विक्रेत्यावर कारवाई करत १९ हजार रुपये किंमतीचा १ किलो गांजा जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकाळभोर गावच्या हद्दीतील माळीमळा येथील चिंतामणी मार्बल्सच्या पाठीमागे ३ जण गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता शुभम बापु पालखे (वय २१ धंदा मजुरी रा. दत्तमंदिर जवळ, १५ नंबर, जुना कॅनल शेजारी हडपसर), मयुर विलास बोरकर (वय २५ धंदा मजुरी रा. सर्वे नंबर ५, वेताळबाबा वसाहत, ग्लायडींग सेंटर जवळ, हडपसर) अमन महंमद रफिक कोतवाल (वय २७ रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी) गांजा विक्री करत होते त्यांच्या जवळील ९३० ग्रॅम वजनाचा १९०००/- रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला.
- ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, क्षिरसागर, ढमढेरे, कटके, नानापुरे यांनी केली आहे.
