थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा)  लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश तात्याराम कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नाताई वाळके यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त  जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.  यावेळी उपसरपंच पदासाठी गणेश कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी सतीश गवारी यांनी गणेश कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधव काळभोर, साधना सहकारी
बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर, माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी सरपंच भोलेनाथ शेलार,राजाराम काळभोर, योगेश काळभोर, माधुरी काळभोर,
सविता लांडगे, माजी उपसरपंच ज्योती काळभोर,ललिता काळभोर, प्रियांका काळभोर, भारती काळभोर,रत्नाताई वाळके, संगीता काळभोर, नागेश काळभोर,
सुनील गायकवाड, राहुल काळभोर, बकुळा केसकर,सविता जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हवेली तालुका आरपीआय च्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच गणेश कांबळे यांचा सत्कार अध्यक्ष मारुती कांबळे यांनी करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *