पुणे (हवेलीनामा वृतसमूह) बारामती नगर रचनाकाराने गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाखाची लाच मागितली तडजोडीअंती पावणे दोन लाख रुपये ठरले यातील पहिला हप्ता एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
बारामती शहर नगर रचनाकार विकास किसनराव ढेकळे यांनी त्यांच्याकडे एका बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम परवान्याचा प्रस्ताव दाखल केला होता तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ढेकळे यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली अशी तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पंचा समक्ष याची शहानिशा केली असता तरजोडी अंती पावणे दोन लाख रुपये देण्याचे ठरले यातील एक लाख रुपयाचा पहिला हप्ता ऑक्सिजन जिम येथे पंचा समक्ष स्वीकारत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या विरुद्ध बारामती शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप सरदेशपांडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
